विक्रमगड : पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणाऱ्या वस्तूंची साठवण आदिवासी बांधव करत आहेत. पावसाळ्यासाठी व दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्यासाठी येथील आदिवासी बाजारात दाखल झाले आहेत.
कांदा, बटाटा, सुके मासे व लसूण यांची खरेदी करताना दिसत आहेत. कांद्याच्या गोण्याच्या गोण्या मोठ्या प्रमाणात साठवण करत आहेत. आज बाजारात कांदा एक रुपये किलोपासून ते १२ रुपये, तर लसूण ८० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत मिळत आहे.
मात्र हाच कांदा पावसाळ्यात ६० ते ७० रुपयांपर्यंत जातो. पावसाळा जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींनी अगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व खरेदीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची बाजारात झुंबड उडाली आहे.