मुंबई : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जातात. त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.
केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा सुमारे १.२५ कोटी लोकांना होणार आहे. केंद्र सरकार आता लवकरच महागाई भत्ता वाढवणार आहे, ज्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकार महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डीए आता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत.
केंद्र सरकारने डीए ५ टक्क्यांनी वाढवल्यास पगारात पूर्ण २७००० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता मानली जाते. केंद्र सरकार यावेळी महागाई भत्ता पूर्ण ४ टक्क्यांनी वाढवू शकते. यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल. २०२२ च्या पहिल्या दोन महिन्यांत निर्देशांकात घसरण होईल.तो जानेवारीमध्ये १२.५ फेब्रुवारीमध्ये १२५ आणि मार्चमध्ये १२६ होता. एप्रिल, मे आणि जूनमध्ये १२६च्या वर राहिल्यास सरकार डीए ४ टक्क्यांनी वाढवू शकते.