आमदार नितेश राणेंचा अकबरुद्दीन औवेसींना इशारा
मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या भेटीवरुन अकबरुद्दीन ओवेसींनी थेट इशारा देत राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे.
अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचे उत्तर प्रेमाने देणार असल्याचे म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली. माझा एक खासदार आहे, तू तर बेघर आहे. मी तुला काय उत्तर देऊ, अशा शब्दात राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. तत्पूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिल्यामुळे ओवेसींवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी ओवेसींनी लक्ष्य केल्यानंतर आता, नितेश राणे यांनीही टिका केली आहे.
या करंट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण, राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”, याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!, अशा प्रखर शब्दात नितेश राणेंनी राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे. तसेच, मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर… आम्ही शिवरायांचे मावळे नाही!, असा इशाराही राणेंनी ट्विटरवरुन दिला आहे.