Monday, January 20, 2025
Homeमहत्वाची बातमीऔवेसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औवेसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपाचे शिवसेनेला आव्हान

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून भाजपा-मनसेसह सत्ताधारी पक्षाकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलेला असताना आता मोहित कंबोज यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, १५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ, असे म्हटले आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज म्हणाले की, औवेसी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करतो. शेरगील उस्मानी हिंदुंवर टीप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमे लावली जातात. १ हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेऊन हिंदुंना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही, कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केले तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले. आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.

तुझे थगडेही तिथेच बांधणार – मनसे

अकबरुद्दीन औवेसी यांनी औंरगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर मनसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस त्या औरंगजेबच्या थडग्या शेजारीच तुझे थडगे आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. हा हैदराबादचा कुत्रा आहे, त्याच्या अंगात पाकिस्तान्याचे रक्त आहे, अशा शब्दात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण – शिवसेना

“संभाजीनगरला वारंवार यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळाले नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळे सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर वाकून महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जे औरंगजेबाचे झाले तेच त्याच्या भक्तांचेही होईल, औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणा-याला तिथेच गाडू” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -