नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी देखील एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसेने करणार आहेत की औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहायला जाणार आहेत, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. ओवेसी इथे आले आणि औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहून गेले. माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर कोणी गेल्याचे ऐकले नव्हते. मात्र ठाकरे सरकार आल्यावर हे पहिल्यांदाच घडले, अशी टीका रवी राणा यांनी केली. तसेच तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग तुमच्या राज्यात असे कसे काय घडू शकते, असा सवालही रवी राणांनी उपस्थित केला आहे.