मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेतर्फे साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. गाडी क्रमांक ०९७४० साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष दि. २४ एप्रिल २०२२ ते २६ जून २०२२ पर्यंत दर रविवारी साईनगर शिर्डी येथून सकाळी ०७.२५ वाजता सुटेल आणि ढेहर का बालाजी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.१० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९७३९ साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष दि. २२ एप्रिल २०२२ ते २४ जून २०२२ पर्यंत दर शुक्रवारी ढेहर का बालाजी येथून रात्री ९.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल.
या गाड्यांना कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, भोपाळ, शुजालपूर, उज्जैन, नागदा, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा आणि जयपूर असे थांबे आहेत. दोन द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन अशी या गाडीची संरचना आहे.
आरक्षण: पूर्णत: आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक ०९७४० साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २० एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.