कल्याण : वरपगाव येथील आत्माराम नगरात राहणाऱ्या सहा वर्षीय मुलाच्या डोक्यावर रविवारी अज्ञाताने गंभीर दुखापत करीत त्याला जखमी केले. या प्रकरणी मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलिसांनी मंगळवारी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरपगावात राहणाऱ्या प्रियंका पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी त्यांचा ६ वर्षीय मुलगा देव पवार हा दुपारी वरप येथील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत केली.