Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित शिक्षकाच्या फोटोचा वापर करून त्यांच्याबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली. या प्रकरणी कालाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.


पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार लालबाग परिसरात राहतात आणि फोटोग्राफीचे प्रशिक्षण देतात. त्यांचा कणकवली येथे फोटोग्राफी स्टुडिओ असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या क्लासेसची माहिती देतात. त्यांचे 'OCL' नावाचे यूट्यूब चॅनलही असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Mumbai Mayor)


26 ऑगस्ट रोजी रात्री एका महिलेने तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर यूट्यूब व्हिडिओची लिंक पाठवली. लिंक उघडल्यानंतर 'GK-Shorts-Videos' या चॅनलवर 'राजनीता ऋतू तावडे के पति राजेश तावडे का जीवन परिचय' या नावाचा शॉर्ट व्हिडिओ आढळला. या व्हिडिओमध्ये तक्रारदाराचा फोटो वापरून त्यांना महापौर ऋतू तावडे यांचे पती म्हणून दाखवण्यात आले होते.


https://www.prahaar.in/2026/08/30/heart-wrenching-how-a-pregnant-girlfriend-was-eliminated-one-plot-by-the-boyfriend-and-it-was-all-over-police-action-causes-a-stir/

व्हिडिओमध्ये त्यांच्याबाबत बिल्डर, बांधकाम व्यावसायिक, बी.कॉम शिक्षण घेतलेली व्यक्ती तसेच क्रिकेट आणि प्रवासाची आवड असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. त्यांचा फोटो फेसबुकवरून आणि महापौरांचा फोटो सोशल मीडियावरून घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


हा व्हिडिओ 23 ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला होता. संबंधित चॅनलवर राजकीय नेते आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींशी संबंधित विविध व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आले आहे. तक्रारदाराने व्हिडिओचे स्क्रीनशॉट आणि इतर माहिती पोलिसांकडे दिली आहे. ( Kalachowki Police)


या प्रकरणी कालाचौकी पोलिसांनी बदनामीसह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ कोणी तयार केला, तो कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. ( Defamation Case)

Comments
Add Comment

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

BMC : फेरीवाल्यांचा माल पकडून नेण्याच्या वाहनांवरच होतोय महापालिकेचा १२ ते १३ कोटींचा खर्च

उपयोग शून्यच! मुंबई (सचिन धानजी): मुंबईत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी

Kurla Nehru Nagar Flood Prevention : कुर्ला पूर्व नेहरु नगरमधील तुंबणारे पाणी रोखण्यासाठी ७ कोटींचा बांध

- मिनी पंपिंग स्टेशनची उभारणीसह पुर प्रतिबंधक गेटचे बांधकाम मुंबई (विशेष प्रतिनिधी) कुर्ला (पुर्व) येथील नेहरु

Raosaheb Patwardhan Garden Development : वांद्रे पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन गार्डनचा होणार विकास

- तब्बल पाच कोटींचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे पश्चिम येथील राबसाहेब पटवर्धन उद्यानाचा आता

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; विदर्भात मात्र पावसाचा जोर, कोकणासह राज्यात हवामानाचा ‘असा’ अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र विदर्भातील

Mumbai Crime : बापरे! गरोदर राहिलेल्या प्रेयसीचा असा काढला काटा... प्रियकराचा तो एक कट अन् सगळंच संपलं

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात गरोदर महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत