- मिनी पंपिंग स्टेशनची उभारणीसह पुर प्रतिबंधक गेटचे बांधकाम
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
कुर्ला (पुर्व) येथील नेहरु नगर नाल्याची पातळी वाढून उलट प्रवाह होवून आसपासचा मार्ग जलमय होत असल्याने येथील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी मिनी पंपिंग स्टेशनसह याठिकाणी भाडेतत्वावर पंपांची सेव उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून आला आहे. (Kurla Nehru Nagar Flood Prevention)
कुर्ला पूर्व येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या जवळील भागातील पर्जन्य जलवाहिनीच्या पाण्याचा निचरा नेहरु नगर नाल्यामध्ये होतो व नेहरु नगर नाल्याच्या पाण्याचा निचरा माहुल च्या खाडीमध्ये होतो. या कारणामुळे नेहरु नगर नाल्याचा समावेश भरती व ओहोटी प्रवण क्षेत्रामध्ये होतो. भरतीच्या वेळी जेव्हा जास्त पाऊस होतो, तेव्हा नेहरु नगर नाल्याच्या पाण्याची पातळी वेगाने वाढते. या नाल्याच्या पाण्याची पातळी जेव्हा पर्जन्य जलवाहिन्यांच्या पाण्याच्या पातळी पेक्षा जास्त असते, त्यावेळी नाल्याच्या पाण्याचा उलट प्रवाह पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये शिरकाव करतो. म्हणुन, पावसाळयामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे आजुबाजुचा परिसर जलमय होतो. (Kurla Nehru Nagar Flood Prevention)
https://www.prahaar.in/2026/08/30/raosaheb-patwardhan-garden-development-raosaheb-patwardhan-garden-in-bandra-west-to-be-developed-a-whopping-%E2%82%B95-crore-to-be-spent/
यावर उपाययोजना म्हणून स्वामी विवेकानंद शाळा पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखावर पुरप्रतिबंधक गेट्सची उभारणी करण्यात येणार आहे. या पंपिंग स्टेशनची बांधणी, पुरवठा, स्थापना करणे तसेच बसविलेल्या पुरप्रतिबंधक गेट्सचे देखभाल करुन पावसाचे पाणी उपसा करणाऱ्या या पंपांच्या या सेवा २०२६ ते २०२९ च्या पावसाळ्यामध्ये भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. (Kurla Nehru Nagar Flood Prevention)
http://prahaar.in/2026/08/30/maharashtra-weather-alert-rain-to-take-a-break-by-the-end-of-august-however-heavy-rainfall-expected-in-vidarbha-here-is-the-weather-forecast-for-the-state-including-konkan/
या कामामध्ये ६००० घनमीटर प्रति तास क्षमतेचे (२००० घनमीटर प्रति तास क्षमतेचे दोन पंप आणि १००० घनमीटर प्रति तास क्षमतेचे दोन पंप) पंप भाड्याने घेण्याचा प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त, पंपांची पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तपासणीकरीता भाडेतत्वावर विद्युत चुंबकीय प्रवाहमापक पुरविणे व त्याची देखभाल व दुरुस्ती करणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे पुरप्रतिबंधक गेट्सची उभारणी केली जाईल तसेच पुरप्रतिबंधक गेटची देखभाल व दुरुस्ती पावसाचे पाणी या पंपांच्या सेवा २०२६ ते २०२९ च्या पावसाळ्यात भाडेतत्वावर कामाचा कालावधी २५मे ते १५ ऑक्टोबर या कालावधीत भाडेतत्वावर पंपांची सेवा पुरवण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये ए.आर.डब्ल्यू इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीची निविड करण्यात आली आहे. याकरता ७.१४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पंपिंग स्टेशनच्या देखभालीकरता लागणाऱ्या मनुष्यबळाची नेमणुक तसेच पंप चालू ठेवण्यासाठी भाडेतत्वावर डिझेलवर इन्व्हर्टरची सुविधा कंत्राटदार कंपनीने पुरवणे आवश्यक आहे. (Kurla Nehru Nagar Flood Prevention)