Saturday, August 29, 2026

Saptashrungi Devi Temple Kalasharohan : असंख्य भाविकांच्या योगदानातून साकारले पवित्र कार्य; सप्तशृंगी देवी मंदिरावर आज विधिवत कलशारोहण

Saptashrungi Devi Temple Kalasharohan : असंख्य भाविकांच्या योगदानातून साकारले पवित्र कार्य; सप्तशृंगी देवी मंदिरावर आज विधिवत कलशारोहण

नाशिक : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील जगप्रसिद्ध श्री सप्तशृंगी देवी मंदिराच्या नवीन कलशारोहणाचा ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सोहळा आज म्हणजेच रविवार (३० ऑगस्ट) रोजी दुपारी १२.३० वाजता श्रावण कृष्ण द्वितीया, आदित्य पूजन मुहूर्तावर विधिवत पार पडणार आहे. या मंगल सोहळ्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे लक्ष लागले आहे. (Saptashrungi Devi Temple Kalasharohan)

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने मंदिरावर नवीन कलशारोहण करण्याचा मंगल संकल्प हाती घेण्यात आला होता. या पवित्र कार्यासाठी हजारो भाविकांनी वस्तूरूपाने तसेच देणगीच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भाविकांची श्रद्धा, विश्वास आणि सहकार्य यांच्या बळावर हे ऐतिहासिक कार्य साकार झाले असून, त्यामुळे संपूर्ण सप्तशृंगगड परिसरात उत्सवाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. (Saptashrungi Devi Temple Kalasharohan)

https://www.prahaar.in/2026/08/30/two-women-lost-their-lives-in-separate-accidents-in-mumbai-police-have-registered-a-case/

या सोहळ्यात श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मदाय सहआयुक्त (नाशिक विभाग) विवेक सोनुने यांच्या शुभहस्ते श्री सप्तशृंगी माता मंदिराच्या कलशाचे पूजन व कलशारोहण करण्यात येणार आहे. प. पू. महामंडलेश्वर स्वामी श्री संविदानंद सरस्वती (कैलास मठ, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली कलश स्थापना विधी संपन्न होणार आहे. (Saptashrungi Devi Temple Kalasharohan)

यावेळी विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आजी-माजी विश्वस्त, साधू-संत, पुरोहित, कर्मचारी, ग्रामस्थ, व्यापारी संघाचे सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या कलशाचे विधिवत आरोहण करण्यात येणार आहे. या पवित्र कार्यासाठी योगदान देणारे सर्व दाते, सेवेकरी आणि भाविक यांच्याप्रती श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने कृतज्ञता व्यक्त केली आहे. भाविकांच्या सामूहिक श्रद्धेतून साकारलेले हे कार्य सप्तशृंगगडाच्या धार्मिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Saptashrungi Devi Temple Kalasharohan)

https://www.prahaar.in/2026/08/29/swine-flu-cases-increase-in-maharashtra-delhi-karnataka/

दरम्यान, सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, देशभरातील भाविकांना या ऐतिहासिक सोहळ्याचा अनुभव घेता यावा यासाठी ट्रस्टच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्ट प्रशासनाने दिली. (Saptashrungi Devi Temple Kalasharohan)

श्री सप्तशृंगी देवी मंदिरावरील कलशारोहणाचा हा मंगल आणि सुवर्णक्षण सप्तशृंगगडाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. त्यामुळे या सोहळ्याबाबत भाविकांमध्ये मोठा उत्साह असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. (Saptashrungi Devi Temple Kalasharohan)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >