खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि टाटा पंच गाडीने चालत असलेल्या दोन मुलींना उडवले. यानंतर गाडी २५ फूट खोल खड्ड्यात पडली.
चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष ...
गाडीने ज्या दोन मुलींना उडवले त्यांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी असलेल्या या दोन मुलींवर लवेलच्या घरडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलींना उडवल्यानंतर टाटा पंच गाडी २५ फूट खोल खड्ड्यात पडली. यामुळे गाडीतील चार जण गंभीर जखमी झाले. गाडीतील जखमी झालेल्या चौघांनाही लवेलच्या घरडा रुग्णालयात दाखल केले आहे.
परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे उभे राहील व विकास कामांकरीता निधी कमी ...
सध्या लवेलच्या घरडा रुग्णालयात अपघाताशी संबंधित सहा जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघात प्रकरणी तपास सुरू केला आहे.




