Nashik Crime News : गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या जुन्या वादातून हेमंत सूर्यवंशी (२९, रा. होळी चौक, सुरगाणा) या युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात (Saputara Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 288 भारतीय नागरिक ...
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून वाद टोकाला
पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व कुणाल यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनावेळी वाद झाला होता. २६ ऑगस्टला हेमंत हा मित्र विजय खंबाईत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासह सापुतारा येथे मॉन्सून फेस्टिव्हलसाठी (Monsoon Festival) गेला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात पुन्हा गणपती विसर्जन व यावर्षीच्या वर्गणीवरून हेमंत व कुणाल यांच्यात वाद झाला. त्यातून कुणालने तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन व छातीत एक वार केला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. (Nashik Crime News)
पालघर : पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू तालुक्यात (Dahanu News) एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली असून, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद परिस्थितीत ...
उपचारादरम्यानच युवकाचा मृत्यू
गंभीर जखमी अवस्थेत हेमंतला तातडीने उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर कुणाल दुचाकीवरून पसार होत कळवण पोलिस ठाण्यात (Kalwan Police Station) हजर झाला. कळवण पोलिसांनी सापुतारा पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी मुख्य आरोपी कुणाल परदेशी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे या घटनेबाबत चौकशी केली जात आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात ...
पोलिसांकडून पुढील तपास सुरु
दरम्यान, या प्रकरणात अन्य चार संशयितांचीही चौकशी करण्यात येत आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेले व्यक्ती आणि हाणामारीची संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आई पद्माबेन सूर्यवंशी व नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. हेमंतच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे हेमंतच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.