नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदीचा मोठा भाग तुटल्याने आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या हानीचा सामना करण्यासाठी भारतीय वायुसेना मदत आणि बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपत्तीच्या काही तासांतच वायुसेनेने सी-130जे विमानाद्वारे 10 टन आवश्यक मदत सामग्री नेपाळमध्ये पोहोचवली. यामध्ये औषधे, तात्पुरते निवारे, ब्लँकेट आणि हायजीन किट्सचा समावेश होता. दुसरी खेप घेऊन वायुसेनेच्या सी-17 ग्लोबमास्टर विमानाने 37.5 टन अतिरिक्त मदत सामग्री (अन्न पाकिटे आणि आवश्यक औषधे) घेऊन काठमांडूसाठी उड्डाण केले. भारताने आतापर्यंत एकूण 47.5 टन मदत सामग्री नेपाळला पाठवली आहे.
मुंबई : सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर ती आधीच पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध सण, नियमित साप्ताहिक ...
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मदत कार्यासाठी वायुसेनेने आपल्या ट्रान्सपोर्ट विमानांचा ताफा स्टँडबायवर ठेवला आहे. यामध्ये सी-17, सी-130जे आणि सी-295 विमानांचा समावेश आहे. एक सी-130जे ट्रान्सपोर्ट विमान आज उशिरापर्यंत मदत सामग्री घेऊन नेपाळसाठी उड्डाण करणार आहे. वायुसेनेची एमआय-17 हेलिकॉप्टरही नेपाळी नागरिकांच्या मदतीसाठी चोवीस तास उड्डाण करत आहेत. मदत सामग्री घेऊन नेपाळला जाणाऱ्या विमानांचे संचालन वायुसेनेच्या हिंडन स्टेशनवरून केले जात आहे.
नवी दिल्ली : देशात लवकरच महिला आरक्षण कायदा लवकर लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संसद पुन्हा बोलावण्याचे ...
आम्ही अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी नेहमीच तयार असतो. त्यामुळे आम्ही तातडीने एक सी-130जे हरक्युलिस विमान तयार केले. त्यामध्ये आम्ही मदत सामग्री, औषधे आणि जनरेटर लोड केले. हे काम नागरी अधिकाऱ्यांच्या आणि एनडीआरएफच्या मदतीने पूर्ण करून ऑपरेशन सुरू करण्यात आले. विमानाने रात्री सुमारे 8.30 वाजता उड्डाण केले आणि दोन तासांच्या आत नेपाळमध्ये उतरून सुमारे 10 टन सामग्री पोहोचवली. याच दुसऱ्या फ्लाइटमध्ये सी-17 विमानातून पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळसाठी 37.5 टन मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सामग्री, औषधे आणि खाद्यपदार्थांची पाकिटे पोहोचवण्यात आली, असे वायुसेनेच्या हिंडन स्टेशनचे एओसी एअर कमोडोर आर. डोभाल यांनी सांगितले. वायुसेना भारताच्या आत तसेच नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका यांसारख्या शेजारी देशांमध्ये अनेकदा मदतकार्य करते. नुकतेच व्हेनेझुएलामध्येही एक ऑपरेशन करण्यात आले होते. जगात कुठेही गरज भासल्यास मदत करण्यासाठी वायुसेना सज्ज आहे. नेपाळमध्ये आणखी मदतीची गरज भासल्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. नेपाळमध्ये 2015 मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी वायुसेनेचे सी-130 विमान मदत पथक आणि डॉक्टरांसह सर्वप्रथम खराब झालेल्या धावपट्टीवर उतरले होते. त्यावेळी वायुसेनेने 2200 हून अधिक उड्डाणे केली होती, असेही ते म्हणाले.






