Nashik Crime News : सुरगाणा हादरला ! वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या

Nashik Crime News : सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. सखाराम गावित आणि त्यांच्या पत्नी बायजाबाई गावित यांचा राहत्या घरात खून करण्यात आलाय. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणात ताब्यात घेतलेल्या नातू आणि नातसुनेने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Surgana Crime News)



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सखाराम गावित (६६) आणि बायजाबाई गावित (६३) हे केळुणे येथील घरात झोपले होते. मंगळवारी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने जोरदार वार करण्यात आले. हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती बुधवारी सकाळी परिसरात पसरली. पोलीस पाटील बापूराव भोये यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांचे (Surgana Police) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली. (Surgana Crime News)



नातू आणि नातसून पोलिसांच्या ताब्यात


दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी सखाराम गावित यांचा नातू देविदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. (Surgana Crime News)



रोजच्या कटकटीला कंटाळून हत्या ?


प्राथमिक माहितीनुसार, वृद्ध दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रोजच्या त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात देविदास आणि वनिता यांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. करणी आणि अंधश्रद्धेतून हत्या झाल्याची चर्चाही परिसरात आहे. मात्र या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Surgana Crime News)


दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Gold Rate Today : ग्राहकांसाठी सोन्यासारखी संधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता सोन्याच्या

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

Mumbai Garbage-Free : पुढील चार वर्षांत मुंबई कचरापेट्या मुक्त?

- सार्वजनिक कचरा पेट्या हटवून घरोघरी कचरा उचलण्यावर दिला जाणार भर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील कचरा