Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील एकूण २० हजार ३४१ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १७३ कोटी ६९ लाख ९३ हजार २८७ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली होती. यापैकी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ हजार ३११ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६ कोटी ७२ लाख ६५ हजार ५२८ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकेच्या ८ हजार ३० पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६ कोटी ९७ लाख २७ हजार ७५९ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली.
Nashik : नाशिक शहराला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) थेट जोडण्यासाठी पांढुर्ली येथे नव्या कनेक्टरची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला ...
दुसऱ्या यादीतील ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दिलासा
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुसऱ्या यादीकडे लक्ष लागून होते. दुसऱ्या टप्प्यात २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील एकूण ९ हजार ७३१ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी ५१ लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) ४ हजार ८५६ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४ कोटी ९२ लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकेच्या ४ हजार ८७५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ४५ कोटी ५७ लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३० हजार ७२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण २६० कोटी २१ लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद, समितीचे सदस्य- सचिव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक कुंदन भोळे यांनी दिली आहे.
Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात ...
सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख २ हजार २७३ असून, त्यांच्या खात्यावर २ हजार २८४ कोटी ४४ लाख ६ हजार ५९० रुपये वितरित करण्यात आले. या विभागात बीडमध्ये ४०० कोटी ३२ लाख, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८७ कोटी ३२ लाख, धाराशिवमध्ये १८३ कोटी ८५ लाख, हिंगोलीमध्ये १९५ कोटी ६१ लाख, जालन्यात ३६६ कोटी २७ लाख, लातूरमध्ये १२१ कोटी ७ लाख, नांदेडमध्ये ३८१ कोटी ९४ लाख आणि परभणीत ३४८ कोटी २ लाख रुपये वितरित करण्यात आले.
तर नाशिक विभागातील ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी ४ लाख १८ हजार रुपये वितरित करण्यात आले. यात अहिल्यानगरला ४११ कोटी ४८ लाख, धुळ्यात १०३ कोटी ६४ लाख, जळगावमध्ये १०० कोटी ५६ लाख, नंदुरबारमध्ये ५३ कोटी ८३ लाख आणि नाशिकमध्ये ८६ कोटी ५१ लाख रुपये वितरित करण्यात आले.