Maharashtra Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! देशी बैलजोडी खरेदीसाठी मिळणार १.२६ लाखांपर्यंत अनुदान; असा करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी खरेदीसाठी अनुदान योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी ५० टक्के ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. (Maharshtra Farmers)


कोणाला किती अनुदान?


अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी कमाल १ लाख २६ हजार रुपयांपर्यंत म्हणजेच ७५ टक्के अनुदान मिळू शकते. ( Bullock Pair Subsidy)

तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना कमाल ८४ हजार ७५ रुपयांपर्यंत म्हणजेच ५० टक्के अनुदान दिले जाते. (Government Scheme For Farmers)

कोणते शेतकरी पात्र?


या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अल्प किंवा अत्यल्प भूधारक असणे आवश्यक आहे. शेतजमीन संबंधित शेतकऱ्याच्या नावावर असून त्याचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांसाठी संबंधित नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. ( Farmer Welfare)

असा करा ऑनलाइन अर्ज


योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत MahaDBT Portal वर जावे. पोर्टलवर नोंदणी करून किंवा आधीच खाते असल्यास लॉगिन करून पशुसंवर्धन विभागातील ‘बैलजोडी खरेदी योजना’ निवडावी. त्यानंतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करून अर्ज करता येईल.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार?

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. अनेक भागांत पावसाने उघडीप

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई : अमरावतीतील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून तांत्रिक त्रुटी, अग्निशमन यंत्रणेतील बिघाड,

Chhatrapati Sambhajinagar Suicide : "तुमच्या पुढच्या सात पिढ्या यातना भोगतील..." मृत आईच्या त्या शेवटच्या शापाने उघडकीस आले कौटुंबिक वादाचे सत्य?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC