Resort Booking Scam : रिसॉर्टच्या बुकिंग रकमेत 51.75 लाखांचा अपहार; सेल्स मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

रायगड : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभांच्या बुकिंगच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी सेल्स मॅनेजरविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी नाशिक येथील रहिवासी असून तो धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. रिसॉर्टमध्ये आयोजित होणाऱ्या लग्न समारंभांच्या बुकिंगची रक्कम ग्राहकांकडून स्वीकारून ती रिसॉर्टच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.



मात्र, आरोपीने ग्राहकांना बुकिंगच्या रकमेत सवलत देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही ग्राहकांकडून बुकिंगची रक्कम रिसॉर्टच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या बँक खात्यात तसेच रोख स्वरूपात स्वीकारल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. तक्रारीनुसार, एका ग्राहकाकडून 8 लाख रुपये रोख, दुसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख रुपये, तिसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख 50 हजार रुपये आणि चौथ्या ग्राहकाकडून 11 लाख 25 हजार रुपये बँक खात्यात तसेच 2 लाख रुपये रोख स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे एकूण 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.




या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 188/2026 नुसार भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 316(2) आणि 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी शेंबडे करीत आहेत. दरम्यान, प्रकरणातील आर्थिक व्यवहार तसेच संबंधित बँक खात्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असून, या तपासातून अपहाराच्या व्यवहारांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Chhattisgarh : छत्तीसगडच्या IGKV पेपरफुटी प्रकरणी सहा जणांना अटक

रायपूर : इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील (Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya) पेपरफुटी प्रकरणी एक प्राध्यापक आणि पाच विद्यार्थी अशा

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

'Jap-Anushthan' ceremony : त्र्यंबकेश्वर येथे जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ; जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन..

नाशिक :  निष्काम कर्मयोगी,शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी

ST bus accident : रत्नागिरीत एसटी बसची मोटारीला धडक; तिघे जखमी

रत्नागिरी : केळवली फाटा (ता. राजापूर) येथील जामदे पुलाजवळ एसटी बसने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिल्याने

Char Dham Yatra : चारधाम यात्रेत 48 लाखांहून अधिक भाविक दाखल; यमुनोत्रीत नवा विक्रम

देहरादून : उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या आव्हानात्मक परिस्थिती असूनही चारधाम यात्रा सुरू आहे. यात्रेच्या 125

The number of patients increased : भारतात H1N1 चा वाढता संसर्ग; स्वाइन फ्लूपासून बचावासाठी महत्त्वाच्या उपाययोजना

भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या H1N1 (स्वाइन फ्लू) च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लहान