'Jap-Anushthan' ceremony : त्र्यंबकेश्वर येथे जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ; जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन..

नाशिक :  निष्काम कर्मयोगी,शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वार्षिक नागपंचमी जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला.




त्र्यंबकेश्वर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात आयोजित जपानुष्ठान सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी नंतर करण्यात आला.यानंतर लक्षवेधी पालखी मिरवणुक संपन्न झाली. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्या प्रसंगी मौनव्रतातील महाजपानुष्ठान,अखंड नंदादीप,हस्त लिखित नामजप,रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन,महाआरती,भजन,प्रवचन, सत्संग यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमा दरम्यान शेकडो तास श्रमदान संपन्न होणार असून आश्रम परिसरात वृक्षारोपण देखील होणार आहे.




आठवडाभर जपसाधनेसाठी बसलेल्या हजारो भाविकांचा जीवनभर व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला.ज्या भाविकांचे व्यसन चालू होते त्यांच्या कडून व्यसनमुक्तीचा विशेष संकल्प करून घेण्यात आला.व्यसनाच्या तंबाखू,गुटका या पिढ्यांची होळी करण्यात आली.यावेळी भाविकांनी आश्रमातील जगदगुरु बाबाजी, हृदयेश्वर महादेव आणि अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

Comments
Add Comment

Chhattisgarh : छत्तीसगडच्या IGKV पेपरफुटी प्रकरणी सहा जणांना अटक

रायपूर : इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील (Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya) पेपरफुटी प्रकरणी एक प्राध्यापक आणि पाच विद्यार्थी अशा

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Resort Booking Scam : रिसॉर्टच्या बुकिंग रकमेत 51.75 लाखांचा अपहार; सेल्स मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

रायगड : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभांच्या बुकिंगच्या

ST bus accident : रत्नागिरीत एसटी बसची मोटारीला धडक; तिघे जखमी

रत्नागिरी : केळवली फाटा (ता. राजापूर) येथील जामदे पुलाजवळ एसटी बसने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिल्याने

Char Dham Yatra : चारधाम यात्रेत 48 लाखांहून अधिक भाविक दाखल; यमुनोत्रीत नवा विक्रम

देहरादून : उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या आव्हानात्मक परिस्थिती असूनही चारधाम यात्रा सुरू आहे. यात्रेच्या 125

The number of patients increased : भारतात H1N1 चा वाढता संसर्ग; स्वाइन फ्लूपासून बचावासाठी महत्त्वाच्या उपाययोजना

भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या H1N1 (स्वाइन फ्लू) च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लहान