Nashik Crime News : नाशिकच्या महात्मा गांधी रोडवरील क्रीडा साहित्य आणि वाद्य विक्री करणाऱ्या दोन व्यापारी बंधूंना तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, धमकी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. (Nashik Crime News)
राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. राज्यभरातील तब्बल ...
...तर पहिला खून तुमचा होईल
१८ आणि १९ ऑगस्ट रोजी व्यापाऱ्यांना ऑस्ट्रेलियासह (Australia) इतर आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून फोन आले. या कॉलमध्ये ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’चा (Lawrence Bishnoi Gang) उल्लेख करत संशयित शुभम लोणकर (Shubham Lonkar) याचे नाव घेण्यात आले. पैसे न दिल्यास ‘पहिला खून तुमचा होईल’, अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामागे खरंच बिश्नोई गँगचा संबंध आहे का, की आंतरराष्ट्रीय क्रमांक आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर करून स्थानिक टोळीने खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला आहे का , या दोन्ही शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. (Nashik Crime News)
Nashik Crime News : नाशिकमधील एका कंत्राटदाराच्या मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ५० लाख ४७ हजार रुपये ...
सरकारवाडा पोलिसांकडून तपास सुरु
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) संशयित शुभम लोणकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात खंडणीच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, कॉल करणाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ठिकाण आणि ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याने सायबर पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कॉलचे तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे धमकीमागील व्यक्ती किंवा टोळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.