Nashik Crime News : नाशिकच्या शरणपूर रोडवरील न्यू पंडित कॉलनीत मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. ‘अरिहंत’ बंगल्यात कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने किचनच्या पॅसेजमधील लोखंडी ग्रिलवरून उडी मारत घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनची काचेची खिडकी उघडून ट्रॉलीच्या ड्रॉवरमधील तब्बल २ लाख ३७ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारला.(Nashik Crime News)
नेमकी घटना काय ?
१४ जुलैच्या रात्री ११ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास न्यू पंडित कॉलनीतील (New Pandit Colony) 'अरिहंत’ बंगल्यात ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिक करण राजेंद्र शाह हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्याने संधी साधली. किचनमधून प्रवेश केल्यानंतर त्याने शिताफीने चांदीच्या वस्तू लंपास केल्या आणि पसार झाला. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ७ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये ५ किलो वजनाचा डिनर सेट, दोन किलो वजनाचे दोन चांदीचे जग तसेच बाऊल, वाट्या, चमचे, डिश, काटे आणि ग्लास अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. (Nashik Crime News)
Nashik : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या महिलेच्या ...
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी करण शाह यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, गजबजलेल्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शरणपूर रोड परिसरातील बंगल्यातच मध्यरात्री चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे .(Nashik Crime News)
चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तू
५ किलो वजनाचा डिनर सेट, यात १ ताट, १ ग्लास, १ डिश, १ वाटी, १ चमचाचा समावेश आहे ज्याची किंमत रु. १,५०,००० आहे तर साठ हजारांचे २ किलो वजनाचे दोन जग २५० ग्रॅमचा बाऊल, वाटी, चमचे, डिश, काटा चमचा आणि चांदीचे ग्लास असा एकूण १५० ते २५० ग्रॅम वजनाचा ऐवज चोरट्याने पळवला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून (Sarkarwada Police Station) आधी तपास सुरु आहे.






