मुंबई: मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी सकाळी तळमजला अधिक एक मजली घर अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घर कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ढिगारा पसरला असून, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात न्यू अनारकली रेस्टॉरंटजवळ ही घटना घडली. घर कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने परिस्थितीची पाहणी करून ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. (Malvani House Collapse)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा (Govinda - Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक नात्यातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुनीता अहुजा ...
घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये रस्त्यावर घराचा मोठा ढिगारा पडल्याचे दिसत आहे. अरुंद रस्त्यावर ढिगारा असल्याने तो हटवताना अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत असल्याचेही दिसून येत आहे. स्थानिक नागरिकही बचाव पथकाला मदत करत असल्याचे समोर आले आहे. (House Collapse)
या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाकडून तपासणी सुरू आहे. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे. (Mumbai news)
घर नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घराची अवस्था, बांधकामाची स्थिती आणि घटनेच्या वेळी घरात कोणी उपस्थित होते का, याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळाची पाहणी करून घर कोसळण्यामागचे कारण शोधण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बचाव पथकाचे काम सुरू आहे. ( Malad House Collapse)