Rakhi Outfit 2026 : साधा कपडा अन् थोडी कल्पकता! यंदाच्या राखीला टेलरकडून शिवून घ्या 'हे' ५ डिझायनर सूट; रेडीमेडही पडतील फिके

रक्षाबंधन (Rakshabandhan 2026) म्हणजे बहिणींसाठी खास नटण्याचा आणि आवडीचे कपडे घालण्याचा सण! बाजारातील महागडे आणि तेच तेच रेडीमेड कपडे घेण्यापेक्षा, यंदा स्वतःच्या पसंतीने शिवलेला डिझायनर सूट परिधान करणे हा उत्तम पर्याय आहे. योग्य कापड आणि थोडी कल्पकता वापरून तुम्ही अगदी साध्या कपड्यातही अत्यंत महागडा आणि एलिगंट लुक मिळवू शकता. गुलाबी, पिवळा, हिरवा, लाल आणि पेस्टल रंगाचे कपडे या सणासाठी अगदी परफेक्ट ठरतात.



टेलरला कपडा देण्यापूर्वी 'या' सोप्या टिप्स नक्की वापरा :


टेलरला मनातली डिझाईन तोंडी सांगण्यापेक्षा त्याचा स्पष्ट फोटो दाखवा.


व्ही-नेक, बोट-नेक आणि बाह्यांची लांबी आधीच नक्की करा.


सूटवरील एम्ब्रॉयडरी किंवा गोटा-पट्टीशी मॅच होणाराच दुपट्टा निवडा.


ऐनवेळी होणारी धावपळ आणि घोळ टाळण्यासाठी सणाआधीच कपडे शिवायला द्या.


सणाच्या २-३ दिवस आधी एक ट्रायल घेऊन फिटिंग तपासून घ्या.



यंदा ट्रेंडमध्ये असलेले ५ डिझायनर सूट :




घेरदार अनारकली सूट: सिल्क किंवा जॉर्जेट कापडावर अंगरखा पॅटर्नचा अनारकली सूट सणाच्या दिवशी अतिशय भव्य आणि क्लासिक दिसतो.



मॉडर्न शरारा सेट : शॉट कुर्तीसोबत जोडलेला घेरदार शरारा आणि गोटा-पट्टीची ओढणी तुम्हाला परफेक्ट ट्रॅडिशनल लुक देते.



स्ट्रेट पँट सूट : ज्यांना साधा पण सोबर लुक आवडतो, त्यांच्यासाठी डिझायनर पँट आणि गळ्यावर हलकी नक्षी असलेला स्ट्रेट कुर्ता उत्तम पर्याय आहे.



स्टायलिश पेपलम कुर्ती : वेस्टर्न आणि ट्रॅडिशनलचा मेळ घालणारी पेपलम कुर्ती प्लाझो किंवा शरारासोबत खूपच उठून दिसते.


हेव्ही गळा आणि फुल स्लीव्हज : साध्या कपड्यावर मोत्यांची बॉर्डर किंवा डोरी-लूप्स लावून गळा हेव्ही बनवावा. यामुळे साधा सूटही डिझायनर वाटतो.


फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
Comments
Add Comment

Maharashtra Politics : ‘पक्ष आणि चिन्ह गोठवणाऱ्यांनी विचारही गोठवावेत का?’; शिवसेनेचे व्यंगचित्रातून उबाठा गटावर टीकास्त्र

मुंबई : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

UBT : धाराशिव जिल्ह्यात 'उबाठा'ला खिंडार

- १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राणा जगजीतसिंह पाटलांनी ओमराजे-कैलास पाटलांना दिला मोठा धक्का मुंबई : धाराशिव

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांचा वारसा आता भित्तिचित्रातून उलगडणार, अभिनव भारत मंदिरासाठी २.५० कोटींची मंजुरी

Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) आणि नाशिक यांचे नाते ऐतिहासिक आहे. सावरकरांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या

Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण

Rajpal Yadav : 'आर्थिक संघर्ष माझ्या २६ वर्षांच्या कलात्मक प्रवासावर सावट टाकू शकणार नाही' - राजपाल यादव

मुंबई : राजपाल यादव यांनी स्वतःला भारतीय चित्रपटसृष्टीशी नितांत वचनबद्ध असलेला कलाकार म्हटले असून, त्याच्यामते