Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गोदावरीसह नद्या स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याबरोबरच घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन आतापासूनच करावे, अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Minister Pankaja Munde) यांनी दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात महानगरपालिकेत बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
Nashik Crime News : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात (Wadivarhe area) गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. मंगळवारी दुपारी दोन ...
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढवा
कुंभमेळा कालावधीत घनकचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे आतापासूनच नियोजन करावे. भाविकांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांची उपलब्धता सुनिश्चित करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढवावा. आवश्यकतेनुसार पर्यावरण विभागातर्फे सहकार्य करण्यात येईल, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत नदी स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम सुरू असून ते वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या परिसरात नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त मनीषा खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Nashik : हरिहर गड (Harihar Fort) हा नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रांगेत असून, खडकात कोरलेल्या ...
सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन गरजेचे
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, नदी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी, नंदिनीसह विविध नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त व बारमाही प्रवाहित राहतील, याची दक्षता घ्यावी. सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करून ते थेट नदीपात्रात जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मलनिःस्सारण व जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या कामांना गती देऊन त्यांची क्षमता वाढवावी. तंत्रज्ञानाचा वापर तसेच शुद्ध पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करावे. ही कामे वेळेत पूर्ण करावीत.
nashik-major-fda-crackdown-in-nashik/
यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, विभागीय उपायुक्त विठ्ठल सोनवणे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.