Ahilyanagar Crime News : एसटी कर्मचाऱ्याचे अपहरण करून लूट, दोघे ताब्यात

Ahilyanagar Crime News : पुणे बसस्थानक परिसरातून एसटी महामंडळातील लिपिकाचे अपहरण करून निर्जनस्थळी नेत मारहाण करत लूट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police) गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन संशयित आरोपींना सावेडी परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील मोबाईल, रोकड आणि दुचाकीसह सुमारे ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिषेक सुनील शिरसाठ (वय २३) आणि अनुष शांतवन धीवर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


१८ ऑगस्ट रोजी फिर्यादी पुणे बसस्थानक (Pune Bus Station) परिसरात असताना आरोपींनी त्यांना गाठले. त्यानंतर त्यांना बुरुडगाव रोड परिसरातील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे आरोपींनी लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. आरोपींनी मोबाईलचा तसेच ‘फोन पे’चा पासवर्डही बळजबरीने मिळवला. त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून ७ हजार १०० रुपये अनोळखी खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला तेथेच सोडून पलायन केले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.



२४ तासांत संशयितांना बेड्या


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नितीन देशमुख आणि गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानंतर सावेडी परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अभिषेक शिरसाठ आणि अनुष धीवर अशी नावे सांगितली. तसेच प्रवीण शेजवळ (रा. कोंढवड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्या साथीने हा गुन्हा केल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून मोपेड दुचाकी, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे करीत आहेत.

Comments
Add Comment

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 'टीस'च्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लावणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विशेष बैठक मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू

Crime News : ‘तू घरी बसून फुकट खातेस’ म्हणत पत्नीला त्रास, उपरण्याने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

Crime News : ‘माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मला खूप पैसे मिळाले असते. तू घरी बसून फुकट खातेस,’ असे म्हणत

Ashish Shelar : महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या समग्र

Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना मिळणार आर्थिक मदत

- मत्स्य विभागाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव; ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना होणार लाभ मुंबई : पावसाळ्यात दोन ते

Maharashtra Politics : ‘पक्ष आणि चिन्ह गोठवणाऱ्यांनी विचारही गोठवावेत का?’; शिवसेनेचे व्यंगचित्रातून उबाठा गटावर टीकास्त्र

मुंबई : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.