Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच दोन साप आढळल्याची घटना समोर आली आहे. 17 ऑगस्ट रोजी मन्नतच्या लॉन आणि परिसरात दोन साप दिसल्यानंतर सर्पमित्रांना तातडीने पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकातील सर्पमित्र विकी दुबे मन्नत येथे पोहोचले. शोध घेतल्यानंतर जिन्याखाली सुमारे 8 फूट लांबीचा धामन आढळून आला. धामन म्हणजेच इंडियन रॅट स्नेक. हा साप बिनविषारी असून उंदरांसारख्या प्राण्यांची शिकार करून पर्यावरणातील समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. सर्पमित्रांनी या सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.



मात्र, दुसऱ्या सापाची कहाणी अद्याप संपलेली नाही. मन्नत परिसरात लोकांची ये-जा सुरू झाल्यानंतर दुसरा साप निसटल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो अद्याप सापडलेला नाही. या घटनेची माहिती वन विभागालाही देण्यात आली. सुदैवाने, सापडलेला धामन बिनविषारी असल्याने रहिवासी किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाल्याचे वृत्त नाही. विशेष म्हणजे, नागपंचमीच्या दिवशीच ही घटना घडल्याने सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा रंगली आहे. दरम्यान, यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही साप आढळला होता, ज्याची सर्पमित्रांनी सुरक्षितपणे सुटका केली होती. आता मन्नतमधून निसटलेला दुसरा साप नेमका कुठे गेला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.