अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता कायम आहे. पश्चिम आशियातील घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलासह सोने आणि चांदीच्या बाजारावरही होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, 17 ऑगस्ट 2026 रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातूंच्या दरात तेजी दिसून आली. सकाळी 7.30 वाजता कॉमेक्सवर सोन्याच्या दरात 1.19 टक्क्यांची वाढ झाली. सोन्याचा भाव 4,464.10 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. त्याचवेळी चांदीचा दर 65.885 डॉलर प्रति औंसवर गेला. (Gold rate)
देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली. MCX वर सकाळी 9.15 वाजता सोन्याचा वायदा भाव 1.55 लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचला. चांदीच्या वायदे दरात 0.78 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून भाव 2,37,427 रुपये प्रति किलोवर पोहोचला. मुंबईतील सराफा बाजारात चांदीचा भाव 2,49,900 रुपये प्रति किलो असल्याची माहिती आहे. (Gold Rate Today)
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. यूएस जिओलॉजिकल ...
जागतिक पातळीवरील वाढता तणाव हे सोने आणि चांदीच्या दरवाढीमागचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. त्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीची मागणी वाढू शकते. पश्चिम आशियातील तणाव आणि अमेरिका-इराण संबंधांमधील अनिश्चिततेकडे बाजाराचे लक्ष आहे. (Silver Price)
दरम्यान, कच्च्या तेलाच्या बाजारातही चढ-उतार कायम आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती आणि तेलाच्या वाहतुकीबाबतची चिंता यामुळे बाजारात अनिश्चितता आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 0.7 टक्क्यांची वाढ होऊन भाव 89 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर WTI क्रूडच्या किमतीत 40 सेंटची घट झाली असून भाव सुमारे 83 डॉलर प्रति बॅरलवर आला. (Gold Silver)
तेल प्रकल्प आणि टँकर्सवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात दोन्ही प्रमुख क्रूड बेंचमार्कमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. त्यामुळे आगामी काळात पश्चिम आशियातील घडामोडींचा परिणाम सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर किती होतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. (Gold Price Update)