Caste Based Census : देशात पहिल्यांदाच जातआधारीत जनगणना, अधिसूचना जाहीर; ४० प्रश्नांची यादी जाहीर

नवी दिल्ली : देशातील आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने ४० प्रश्नांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे, या जनगणनेदरम्यान पहिल्यांदाच जातीशी संबंधित माहितीही विचारली जाणार आहे. याशिवाय, कौटुंबिक माहिती, शिक्षण, रोजगार, एवढेच नाही तर कोविड लसीकरणाची माहितीही विचारली जाणार आहे.


देशाचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांच्या आदेशानुसार, जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील बर्फाच्छादित भागांत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जनगणना प्रक्रिया पार पडेल. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यापूर्वी नागरिकांसाठी १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान 'सेल्फ एन्यूमेरेशन' अर्थात स्वतःच माहिती भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच, देशाच्या उर्वरित भागांमध्ये पुढील वर्षी जनगणना सुरू होईल.



जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या ४० प्रश्नांमध्ये सर्वप्रथम व्यक्तीचे नाव, कुटुंब प्रमुखाशी असलेले नाते, लिंग, जन्मतारीख आणि वय, सद्य वैवाहिक स्थिती, विवाहाच्या वेळचे वय, पती किंवा पत्नीचे नाव, घोषित राष्ट्रीयत्व, धर्म, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा जात, वडिलांचा तपशील, आईचा तपशील आणि अपंगत्वाची (दिव्यांगत्वाची) माहिती विचारली जाईल. त्यानंतर मातृभाषा आणि ज्ञान असलेल्या इतर भाषा, साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती, शिक्षण संस्थेतील उपस्थिती किंवा शिक्षणाची स्थिती, सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि शाखा अथवा विषय, गेल्या एका वर्षादरम्यान कधीही काही काम केले आहे का, आर्थिक उपक्रमांची श्रेणी, व्यवसाय किंवा पेशा, उद्योग, व्यापार किंवा सेवेचे स्वरूप, कामगाराची श्रेणी, बिगर-आर्थिक उपक्रम, कामाच्या शोधात आहात किंवा कामासाठी उपलब्ध आहात का, आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याची स्थिती याबद्दल माहिती घेतली जाईल.


तसेच जन्मस्थान, शेवटचे रहिवास स्थान, स्थलांतराचे कारण, शेवटच्या स्थलांतरानंतर या गावात अथवा शहरात राहण्याचा कालावधी आणि कायमचा निवासी पत्ता नोंदवला जाईल. महिलांसाठी सध्या हयात असलेल्या मुलांची संख्या (केवळ सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त राहणाऱ्या महिलांसाठी), आतापर्यंत जन्मलेल्या एकूण हयात मुलांची संख्या, आणि गेल्या एका वर्षात जन्मलेल्या हयात मुलांची संख्या विचारली जाईल. शेवटी कोविड-१९ लसीकरणाची जागा, एकूण बँक खात्यांची संख्या, उपलब्ध असल्यास मोबाईल नंबर, उपलब्ध असल्यास आधार क्रमांक, उपलब्ध असल्यास मतदार ओळखपत्र क्रमांक, भारतीय पासपोर्टधारक असल्यास पासपोर्ट क्रमांक, आणि ड्रायव्हिंग लायसन्सची उपलब्धता याविषयीची माहिती गोळा केली जाईल.

Comments
Add Comment

Ajit Doval : "जमीन, आकाश किंवा पाताळात... आम्ही त्यांचा माग काढू" , 'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान मोदींचा संदेश ; अजित डोवाल यांच्याकडून आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट संदेश होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारे मग ते

Fast Track Court : महाराष्ट्रात ११७ फास्ट ट्रॅक कोर्ट, १.३५ लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित

नवी दिल्ली : देशात सध्या कार्यरत असलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टांची (जलद गती न्यायालये) एकूण संख्या ८८४ असून, १७,५४,६७५

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा