Zeeshan Siddique : 'मला येणाऱ्या धमक्यांमागे बिल्डर लॉबीचा हात'

मुंबई : परदेशात असताना पोर्तुगालच्या नंबरवरून मिळालेल्या व्हॉईस नोटद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार झिशान सिद्दीकी यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आपल्याला येणाऱ्या या धमक्यांमागे एका विशिष्ट 'बिल्डर लॉबी'चा हात असून, न्यायालयातील याचिकेची तारीख जवळ आली की अशा धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितले. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.



झिशान सिद्दीकी म्हणाले की, परदेशात असताना पोर्तुगालच्या नंबरवरून आलेल्या व्हॉईस नोटमध्ये 'वडिलांप्रमाणेच तुलाही गोळ्या घालून ठार मारू', अशी धमकी देण्यात आली. यापूर्वीही सोशल मीडियावर धमक्या मिळाल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली असून वांद्रे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. "माझ्या आईने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेची सुनावणी जवळ आली की नेमक्या त्याच वेळी धमक्यांचा पाऊस पडतो. ही निव्वळ योगायोगाची बाब नसून भित्री बिल्डर लॉबी आम्हाला घाबरवण्यासाठी हे कारस्थान रचत आहे," असा आरोप त्यांनी केला.



वडिलांच्या (बाबा सिद्दीकी) हत्येच्या तपासाच्या दिशेवर मी आणि माझे कुटुंब अजिबात समाधानी नाही. आम्ही पोलिसांना संशयितांची जी नावे दिली होती, त्यांची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. हत्येपूर्वी वडिलांशी शेवटच्या काही दिवसांत कुणाचा संवाद झाला होता, याचा शोध पोलीस का घेत नाहीत? पोलीस नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



माझी सुरक्षा का काढली?


दररोज नव्या धमक्या येत असताना नोव्हेंबर महिन्यात माझी सुरक्षा अचानक का काढण्यात आली? पूर्वी माझ्यासोबत ८ पोलीस अधिकारी आणि इमारतीभोवती २२ पोलिसांचा पहारा होता. परंतु, आईने न्यायालयात रिट याचिका दाखल केल्यानंतर दोनच दिवसांत ही सुरक्षा हटवण्यात आली. लोकप्रतिनिधी असलेल्या आमदाराला जर राज्यात सुरक्षित वाटत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच वडिलांच्या खुन्यांचा पर्दाफाश होणार असेल, तर मी १०० गोळ्या खायला तयार आहे, असेही ते म्हणाले. या संघर्षाच्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला