Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण


मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मंत्रालयात (Mantralay) ध्वजारोहण होणार असून, त्यानिमित्त गुरुवारी ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम घेण्यात आली. (Independence Day 2026)


या रंगीत तालीमत राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पोलीस दलाच्या पथकांनी ध्वजाला मानवंदना दिली. या रंगीत तालीमेत मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल तसेच घोडेस्वार पथक सहभागी झाले. यावेळी पोलीस दल, मुख्यमंत्री सुरक्षा दल यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Independence Day 2026)



स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकायुक्त, मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, महावाणिज्य दूतावासांचे अधिकारी यांच्यासह विविध संवैधानिक संस्था व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर, सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच भारतीय सेना, नौदल, वायुदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित राहणार आहेत. (Independence Day 2026)



स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा, संचलन, ध्वजारोहण आणि समारंभाच्या अन्य व्यवस्थांची तयारी पूर्ण करण्यात आली असून, रंगीत तालीमेद्वारे विविध व्यवस्थांची पाहणी करण्यात आली. या रंगित तालीम सोहळ्यात कलाकार किरण शिंदे,अरूण शिंदे आणि विवेक शिंदे यांनी सनई वादन केले. (Independence Day 2026)

Comments
Add Comment

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या

Uday Samant : चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार; मंत्री उदय सामंत

मुंबई : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे