Vinod Tawde : “संसदेचा ६१ टक्के वेळ वाया गेला; याला राहुल गांधी जबाबदार” विनोद तावडेंची टीका

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार म्हणून आपले हे पहिले संसदीय अधिवेशन असल्याचे सांगत भाजप नेते विनोद तावडे यांनी संसदेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर आणि विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.



तावडे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जवळपास १८ ते २० वर्षे काम केले आहे. त्यामुळे संसदेतील अधिवेशनाबाबत त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या. मात्र, पहिल्याच अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनातील केवळ ३९ टक्के वेळेत कामकाज झाले, तर ६१ टक्के वेळ वाया गेला, असा दावा तावडेंनी केला. संसद चालवण्यासाठी करदात्यांच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर खर्च होत असताना कामकाजाचा वेळ वाया जाणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.



“संसदेचे कामकाज का वाया गेले, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे,” असे तावडे म्हणाले.


सरकार चर्चेसाठी तयार होते, गृहमंत्रीही चर्चेसाठी उपस्थित राहण्यास तयार होते; मात्र विरोधकांनीच चर्चेला तयार न राहता संसदेबाहेर आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना तावडेंनी त्यांना “रील मास्टर” असे संबोधले. “विरोधी पक्षनेते जर संसदेऐवजी रील बनवण्यात व्यस्त असतील, तर हे देशाचे दुर्दैव आहे,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, तावडेंच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेतील कामकाजावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nashik : 9 कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई, जि.प.सीईओंची सरप्राईज व्हिजीट

Nashik : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Chief Executive Officer Omkar Pawar) यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची अचानक

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Nashik FDA Raid : नाशिकच्या 'या' भागात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा, बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस मुंबई : शिरोमणी अकाली