Nashik : शिक्षणासोबत संस्कार, स्वसंरक्षणाचे धडेही द्या ! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Nashik : गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशभक्ती, स्वसंरक्षणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्यावर भर द्यावा. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळास्तरावर स्वसंरक्षण प्रशिक्षण, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.



प्रत्येक केंद्रात आदर्श शाळा विकसित करावी


जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे मंत्री दादाजी भुसे (Minister Dadaji Bhuse) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी, मंत्री दादा भुसे म्हणाले की, शाळांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करून जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक केंद्रात आदर्श शाळा विकसित करावी. निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवून विद्यार्थी केंद्रित उपक्रमांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना (Rajiv Gandhi Accidental Insurance Scheme), सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना (Savitribai Phule Child Care Scheme) आदी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा.



नशामुक्त भारत अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन


बैठकीत शाळांमधील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, गुणवत्तावाढीच्या उपाययोजना, विविध योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.यावेळी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal), आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) , आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar), आमदार नितिन पवार (MLA Nitin Pawar) आदी लोकप्रतिनिधींनी वर्गखोल्या, शाळेसाठी जागा, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसटी बस, क्रीडांगण, स्वच्छतागृह व कंपाऊंड आदी पायाभूत सुविधांची मागणी केली. १५ ऑगस्ट रोजी ‘एक पेड माँ के नाम’, ‘हर घर तिरंगा’ व ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे सांगून सक्रिय सहभागाचे आवाहन केले.


यावेळी दृकश्राव्य माध्यमाद्वारे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नरहरी झिरवाळ तसेच आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार नितिन पवार, मालेगावच्या महापौर नसरीन शेख, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मालेगाव महानगरपालिका आयुक्त रविंद्र जाधव, उपमहापौर विलास शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, मनपा शिक्षणाधिकारी मीता चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nashik Crime News : बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Nashik Crime News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील दोडी बु. येथे चार दिवसांपासून

Eknath Shinde : दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करा!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; कायदे तज्ज्ञांची समिती तयार करण्याची सूचना मुंबई : नागरिकांच्या

गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील फौजदारी खटला रद्द

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल करण्यात आलेला लाचखोरी आणि आर्थिक

Eknath Shinde : विमानतळांच्या धर्तीवर होणार एसटीच्या १४७ बसस्थानकांचा कायापालट

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक; प्रवासी सुविधांसह हॉस्पिटल आणि चित्रपटगृहांचाही समावेश मुंबई :

Nashik : सप्तशृंगगड घाटातील धबधब्यांजवळ संरक्षण कठड्याची मागणी

Nashik : पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगगड घाटातील (Saptashrungagad Ghat) भवरी धबधब्यांजवळ (Bhavari Waterfalls) अपघाताची

Baramati Crime : एमपीएससी करणाऱ्या तरुणीच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी बारामतीत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती : सध्याच्या स्पर्धा परीक्ष