Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 3 दिवस मुसळधार सरींचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 9 ते 11 ऑगस्टदरम्यान राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)



‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट :


रविवार 9 ऑगस्ट रोजी काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Update)



मुंबईत कसे राहणार हवामान?


मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)



रविवार 9 ऑगस्ट : विभागवार हवामान अंदाज


- कोकण : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
- मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
- विदर्भ : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. (Maharashtra Monsoon Update)



सोमवार 10 ऑगस्ट : पावसाची स्थिती


- कोकण : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- विदर्भ : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. (Maharashtra Monsoon Update)



शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन :


दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. आता पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने अनेक भागांत सरींचा जोर वाढू शकतो. विशेषतः विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिके आणि शेतीमालाचे नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, बहिणीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त आगमन; विमानतळावर एकनाथ शिंदेंसोबत १० मिनिटे चर्चा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी

BMC : मुंबईतील १९७ किलोमीटर अंतराचे पदपथ झाले अतिक्रमणमुक्त; महापलिका प्रशासनाचा दावा

तब्बल २०० पैकी १३४ रस्त्यांच्या पदपथावरील अतिक्रमण हटवले https://prahaar.in/2026/08/29/bjp-minister-jaykumar-gores-brother-joins-shiv-sena/ मुंबई (विशेष

Agniveer : अग्निवीरांसाठी खूशखबर! सेवेतून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्रात मिळणार पुनर्नियुक्ती

राज्य सरकारकडून १ हजार अधिसंख्य पदे मंजूर; गृह, वन, राज्य उत्पादन शुल्क आणि नगर विकास विभागांचा

Mumbai Higjh Court : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या ‘मराठी सक्ती’विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार मुंबई : राज्यातील रिक्षा आणि

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालय FDA वर नाराज, MCA च्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी लागेल,

Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा