BMC : मुंबईतील १९७ किलोमीटर अंतराचे पदपथ झाले अतिक्रमणमुक्त; महापलिका प्रशासनाचा दावा

तब्बल २०० पैकी १३४ रस्त्यांच्या पदपथावरील अतिक्रमण हटवले



मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथांपैकी १३४ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. या कारवाईत १९७ किलोमीटर एवढ्या अंतराचे पदपथ अडथळामुक्त करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबई पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून पादचारी प्रथम हे अभियान राबविण्यात येत आहे. यासोबतच आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडून या अभियानाबाबत प्रत्येक प्रशासकीय विभागाचा (वॉर्ड ऑफीस) आणि त्या विभागातील विविध खात्यांकडून सुरू असलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात येत आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि नागरिकांनीही या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पादचारी प्रथम’अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, भांडुप रेल्वे स्थानकासारख्या मोठ्या प्रमाणात पादचारी वर्दळ असलेल्या परिसरातील पदपथ अडथळामुक्त करण्यावर भर देण्यात आला. भांडुप परिसरात पहिल्या टप्प्यात १४ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या १४ पदपथांपैकी जवळपास ११ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे.


अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.


या कारवाईमुळे भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या तसेच स्थानकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी पदपथावरील मार्ग मोकळा झाला आहे. गर्दीच्या वेळेत होणारी वाहतूक व पादचारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच भांडुप रेल्वे स्थानक परिसरातून लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने नागरिकांना आता अडथळामुक्त पदपथ मिळणार आहे. या कारवाईसाठी ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार तसेच ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. ‘एस’ विभागाकडून ‘पादचारी प्रथम’ अभियानासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.



व्यावसायिकांसह नागरिकांना आवाहन


पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ मार्गक्रमणासाठी आहेत. पदपथांवर अनधिकृतपणे दुकाने, स्टॉल्स, बांधकामे अथवा कोणतेही साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. पादचारी प्रथम या अभियानांतर्गत पदपथ अडथळामुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.



महानगरपालिका क्षेत्रात १४५९ ठिकाणी कारवाई


या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी १३४ पदपथांचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे १९७ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून, १४५९ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व २६ विभागात हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, बहिणीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त आगमन; विमानतळावर एकनाथ शिंदेंसोबत १० मिनिटे चर्चा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी

Agniveer : अग्निवीरांसाठी खूशखबर! सेवेतून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्रात मिळणार पुनर्नियुक्ती

राज्य सरकारकडून १ हजार अधिसंख्य पदे मंजूर; गृह, वन, राज्य उत्पादन शुल्क आणि नगर विकास विभागांचा

Mumbai Higjh Court : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या ‘मराठी सक्ती’विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार मुंबई : राज्यातील रिक्षा आणि

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालय FDA वर नाराज, MCA च्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी लागेल,

Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा

Vakola River Waste Prevention : ज्ञानेश्वर नगर लगतच्या वाकोला नदीकाठी बसवणार जाळ्या

- नदीत जाणारा कचरा आता थेट रोखला जाणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) ज्ञानेश्वर नगर झोपडप‌ट्टीतील रहिवाशांकडून वाकोला