Milk Price : ...म्हणून दुधाच्या दरात वाढ, 'या' दिवसांपासून लागू होणार दरवाढ

पुणे : पॅकिंग, पाश्चरायझेशनवरील खर्च (दूध शुद्धीकरण प्रक्रिया) आणि इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे असे कारण देत दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कात्रज डेअरीच्या दुधाच्या दरात मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ पासून प्रति लिटर दोन रुपयांची वाढ लागू होणार आहे. तसेच कात्रज डेअरीच्या दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही दहा टक्क्यांपर्यंत वाढ लागू होणार आहे.



दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत दरवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. पॅकिंगच्या खर्चात सुमारे ३० टक्के, पाश्चरायझेशनवरील खर्च (दूध शुद्धीकरण प्रक्रिया) दहा ते बारा रुपये, इंधनाच्या दरात सुमारे दहा रुपयांची वाढ झाली आहे. दूध खरेदीचा दर पण वाढला आहे. यामुळेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.



दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, तसेच उत्पादन, पॅकिंग, वाहतूक आणि इतर खर्चाचा समतोल राखता यावा, यासाठी विक्री दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवाढ झाल्यामुळे दूध प्रति लिटर दोन रुपयांनी महागणार आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही उत्पादनानुसार १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला