नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना स्टार्टअप आणि उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम इनक्युबेशन सेंटर उभारावीत. विद्यापीठांमधून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)
फडणवीस म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ पदवी देण्यापेक्षा रोजगारक्षम आणि कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्यावर भर द्यावा. नाशिक उपकेंद्रात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचनाही त्यांनी केली. विद्यापीठातील संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)
नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून कुंभमेळ्याला विनाकारण बदनाम करण्याचे कारस्थान काहीजण करत आहेत. मात्र, ...
नाशिकच्या औद्योगिक विकासावर बोलताना फडणवीस यांनी कृषी, द्राक्ष उत्पादन व निर्यात, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांत सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)
मुंबई-पुणे-नाशिक हा महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा त्रिकोण असून, पुढील पाच वर्षांत नाशिक राज्याचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या भागात दर्जेदार आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : ईशान्येकडील सीमेवर अमली पदार्थ तस्करांविरोधातील कारवाई तीव्र करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आसाम आणि मिझोरममध्ये गुप्त ...
६२ एकर जागेवर उभारले उपकेंद्र
दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी ६२ एकर जमीन उपलब्ध झाली असून, त्यापैकी ४० एकर जमीन सध्या उपकेंद्राच्या ताब्यात आहे. ३३ हजार चौरस फुटांच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी फर्निचर, संगणक आणि इतर सुविधांसह सुमारे १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. (CM Devendra Fadnavis)
या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यासह दादरा आणि नगर हवेली, सिल्व्हासा यांचा समावेश आहे. उपकेंद्रांतर्गत १९६ महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था, सुमारे २,६०० शिक्षक आणि अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. सध्या एमबीए, बीबीए, मंदिर व्यवस्थापन आणि कार्यकारी एमबीए यांसारखे अभ्यासक्रम सुरू आहेत. (CM Devendra Fadnavis)
भविष्यात तंत्रज्ञान व विधी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम, विविध संशोधन केंद्रे आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.