IAF NEWS : हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या विंग कमांडरला अटक

नवी दिल्ली : एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी भारतीय वायु दलाच्या एका विंग कमांडरला अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.



विंग कमांडर संवेदनशील माहिती देशाच्या शत्रूला पुरवत असल्याचा संशय आल्यामुळे मागील काही आठवड्यांपासून त्याच्यावर पालयत ठेवली जात होती. अखेर ठोस पुरावे हाती येताच या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आणि आता त्याच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. विंग कमांडरला ३० मे २०२६ रोजी अटक केली आणि त्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले, असे भारतीय वायु दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.



अटकेतील आरोपी अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकला होता. या अधिकाऱ्याने सोशल मीडियातून एका मुलीशी ओळख करून घेतली. या मुलीमुळेच हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्याने संवेदनशील माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्याने हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने संवेदनशील माहिती मिळवली आणि ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला दिली. तसेच दिल्ली एनसीआर आणि पश्चिम तळासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळताना संवेदनशील माहिती मिळवून ती पाकिस्तानी गुप्तचराला दिली असल्याचेही तपासातून समजले आहे. यामुळे अधिकाऱ्याविरोधात ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



वैयक्तिक अडचणीत असताना अधिकारी सोशल मीडियातून मुलीच्या संपर्कात आला. पुढे अधिकारी आणि मुलगी यांच्यातील संपर्क फोन कॉल वरून व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचला आणि अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकला. यानंतर आरोपीने फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट (कागदपत्रे) अशा स्वरुपात संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला दिली. संवेदनशील माहिती चोरण्यासाठी अधिकाऱ्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तसेच हॅकिंगच्या तंत्राचाही तज्ज्ञांच्या मदतीने वापर केल्याचे तपासात समजले आहे. अटकेतील अधिकाऱ्याने सेवेत असताना निवडक सहकाऱ्यांच्या फोनला स्पायवेअर उपकरण लावून संवेदनशील माहिती मिळवली असल्याचेही समजले आहे. यामुळे अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केल्याचे भारतीय वायु दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : 'सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार'

नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या

CM Devendra Fadnavis : येत्या ५ वर्षांत नाशिक बनेल महाराष्ट्राचं ‘Growth Engine’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना स्टार्टअप आणि

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे

Rahul Deshpande : ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने रंगली भक्तिरसाची मैफल

नाशिक : ‘कुंभ भक्ती संगम’च्या पहिल्या दिवसाची सांगता राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने भक्तिरसात झाली. ठक्कर

B. Nagendra : कर्नाटकचे मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा, मुख्यमंत्री शिवकुमार यांना धक्का

मनी लाँड्रिंगसह महामंडळातून जवळपास 90 कोटींच्या कथित चोरीचे आरोप बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के.