Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून १२ सराईत गुन्हेगार हद्दपार

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. धुळे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन गुन्हेगारी टोळीतील एकूण १२ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार व्यक्ती जिल्ह्यात आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (Dhule Crime)



१२ सराईत गुन्हेगार हद्दपार


महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५५ आणि ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. कलम ५५ अंतर्गत मोना खालीद पिंजारी, सुलतान खालीद पिंजारी, चॅम्पियनसिंग मिलनसिंग भादा आणि फतेसिंग मिलनसिंग भादा या चौघांना हद्दपार करण्यात आले आहे. (Dhule Crime)



तर कलम ५६ अंतर्गत हाशीम मलक अब्दुल रहेमान, कृष्णा जामसिंग पारधी, विजय श्रावण नेतले, अनिल जामसिंग पारधी,  खुशाल ऊर्फ दादू परमेश्वर गोसावी, भाईदास आकाश मोरे, स्वप्निल बबन घोलप आणि शुभम शरद माळी या आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांना धुळे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश, वास्तव्य किंवा वावर करण्यास मनाई आहे. हद्दपार व्यक्ती जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार

Ritu Tawde : महापौरांच्या गाडीतून त्या नवजात बाळाचा झाला गृहप्रवेश

बाळंतिणीच्या मदतीला धावून गेल्या महापौर मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रसारमाध्यमातून विविध

Chief Minister Devendra Fadnavis : 'सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार'

नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या

CM Devendra Fadnavis : येत्या ५ वर्षांत नाशिक बनेल महाराष्ट्राचं ‘Growth Engine’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना स्टार्टअप आणि

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे