National Handloom Day : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन; 'GRWM' व्हिडिओतून हातमाग उत्पादनांना द्या प्रोत्साहन

राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील तरुणांना हातमाग उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 'Get Ready With Me' (GRWM) या लोकप्रिय सोशल मीडिया ट्रेंडमध्ये हातमागावरील कपडे परिधान करून व्हिडिओ तयार करा आणि तो सोशल मीडियावर शेअर करा, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे भारतीय हातमाग परंपरेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल आणि विणकर कुटुंबांनाही आर्थिक आधार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी 7 ऑगस्टच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देत नागरिकांना हातमाग उत्पादने वापरण्याचे आवाहन केले. (Handloom Products)



पंतप्रधान मोदी म्हणाले की, 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली होती. ब्रिटिश वस्तूंना पर्याय म्हणून स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचा संदेश त्या चळवळीने दिला. त्याच भावनेने आजही भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (National Handloom Day)





ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय हातमाग दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून देशातील विणकरांच्या मेहनतीचा सन्मान करण्याची संधी आहे. भारतातील हातमाग उद्योगात विविधता, पारंपरिक कौशल्य आणि उत्कृष्ट कलाकुसर पाहायला मिळते. या कलेला प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. (Social Media)


 

GRWM  ट्रेंडचा वापर करून...


सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या 'Get Ready With Me' (GRWM) ट्रेंडचा उल्लेख करत त्यांनी तरुणांना हातमागावरील कपडे घालून व्हिडिओ तयार करण्याचे आवाहन केले. अशा व्हिडिओमुळे अधिकाधिक लोक हातमाग उत्पादने वापरण्यास प्रेरित होतील आणि देशातील कारागिरांना त्याचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले. (Handloom)



आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देण्यासाठी


याशिवाय, प्रत्येकाने किमान एक हातमाग उत्पादन खरेदी करून त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करावा, असेही त्यांनी सुचवले. या उपक्रमामुळे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला बळ मिळण्याबरोबरच विणकर कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (PM Modi)


Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत