Ahilyanagar Crime : दगडाने वार करून मनोरुग्ण महिलेचा खून, परिसरात खळबळ

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर (Parner) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील कडूस गावामध्ये उषा पांडुरंग शिंदे (वय 42) या मानसिक रुग्ण असणार्‍या महिलेचा खून झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील उषा शिंदे या मनोरुग्ण महिलेचा मृतदेह कडूस गावाच्या परिसरात आढळून आला. मयत शिंदे या महिलेच्या डोक्यात दगडाने वार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना असून याप्रकरणी नामदेव करंजुले यांच्या खबरवरून पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेच्या मृतदेहाचे पीएम केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. पुढील तपास सुपा पोलिसांकडून सुरु आहेत. (Ahilyanagar Crime)



भीषण अपघातात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू


दरम्यान, दुसरीकडे पाथर्डी ( Pathardi ) तालुक्यातील खरवंडी येथील कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिचे पती जखमी झालेत. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणार्‍या कारमधील चौघा युवकांना बडेवाडी टोलनाक्याजवळ नागरिकांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. (Ahilyanagar Crime)


या अपघातात रत्ना सुनील राठोड (वय 35, रा. सेवानगर तांडा, तोंडोळी ता. पाथर्डी) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती सुनील उत्तम राठोड हे जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर कारमधील चार युवक घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, सतर्क नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून बडेवाडी टोलनाक्याजवळ त्यांना अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात ( Pathardi Police Station ) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम

Palghar Crime : भावाने फोन केला, प्रतिसाद नाही; फ्लॅट उघडताच धक्कादायक दृश्य, पालघरमध्ये ३० वर्षीय महिलेचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातील सातपती रोड परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

CM Devendra Fadnavis : गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)