Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, "मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थाने आज निरोप घेतला असून, मराठी साहित्य क्षेत्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.


मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) जारी केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, औदुंबरसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांचा साहित्यप्रवास मराठी साहित्याला समृद्ध करणारा ठरला. औदुंबर परिसरावरील त्यांचे निस्सीम प्रेम आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्यांच्या ललित लेखनातून जिवंतपणे उमटली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी 'मौज' या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादकपद भूषवले आणि मराठी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण केली.


कवी, ललित लेखक आणि संपादक म्हणून त्यांनी मराठी साहित्याला मोलाचे योगदान दिले. 'मनातल्या उन्हात', 'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' यांसारख्या साहित्यकृतींनी रसिकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. विशेषतः 'डोह' या ललित लेखसंग्रहामुळे त्यांना 'डोहकार' ही ओळख लाभली. (Shrinivas Vinayak Kulkarni)



मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पुढे नमूद केले की, 'मौज' या नियतकालिकाच्या माध्यमातून श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांनी अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मराठी वाचकांना दर्जेदार आणि सकस साहित्याचा सातत्याने लाभ झाला. साहित्यसेवेचा वसा जपणाऱ्या अशा एका व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाला मराठी साहित्यविश्व मुकल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


"श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांचे चाहते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एका समर्पित साहित्यसेवकाचा अंत झाला असून, त्यांच्या साहित्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर