Child Pornography Videos : धक्कादायक! टेलिग्रामवर सुरू होता घाणेरडा धंदा; संभाजीनगरात ५०० रुपयांत विकले जात होते चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तब्बल ३,०४१ चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओंचा संशयित डिजिटल साठा आढळल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Child Pornography Videos)


माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "संभाजीनगरातील चाइल्ड पोर्नोग्राफीचे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. लहान मुलांचा वापर करून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात तीन हजारांहून अधिक व्हिडिओ असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे." (Child Pornography Videos)



टेलिग्रामवरून होत होती विक्री :


सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीकॉम द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना टेलिग्रामद्वारे बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील सामग्री विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी १०० ते ५०० रुपयांमध्ये व्हिडिओ, तर काही छायाचित्रे केवळ 5 रुपयांना विकत असल्याचे तपासात उघड झाले आहे. (Child Pornography Videos)



अटकेपूर्वी डिलीट केले हजारो व्हिडिओ :


पोलिस कारवाईची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी क्लाउड स्टोरेजमधील हजारो व्हिडिओ हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक तपासात त्यांच्या क्लाउड खात्यात ३,०४१ व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सध्या सुमारे २०० व्हिडिओ जप्त केले असून, हटवलेला डेटा फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Child Pornography Videos)



देशभरातून होत होते ऑनलाइन व्यवहार :


तपासात आरोपींच्या बँक खात्यांमध्ये यूपीआयद्वारे गुजरात, पंजाब, दिल्लीसह महाराष्ट्रातील विविध भागांतून पैसे जमा झाल्याचे समोर आले आहे. २०२३ पासून अनेक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, दरमहा ६० ते ७० व्यवहारांतून २० ते २५ हजार रुपयांची कमाई होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे आणि मुंबईतील काही ग्राहकांचाही या व्यवहारांमध्ये समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. (Child Pornography Videos)



मोठ्या डार्कनेट रॅकेटचा संशय :


प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेले विद्यार्थी केवळ वितरक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हजारो व्हिडिओ पुरवणारा मुख्य स्रोत परराज्यातील एका मोठ्या डार्कनेट सिंडिकेटशी जोडलेला असण्याची शक्यता तपासली जात आहे. गेल्या तीन वर्षांतील डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेतल्यास मोठे आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. (Child Pornography Videos)


या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू असून, आणखी काही संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,