Nashik : नाशिक महापालिकेने ११,६०९ खड्डे बुजवले, रस्ते दुरुस्तीची मोहीम युद्धपातळीवर

Nashik : मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबविली आहे. जून महिन्यापासून २९ जुलैपर्यंत ११,६०९ खड्डे बुजविण्यात आले असून, त्यानंतर अवघ्या चार दिवसांत (३० जुलै ते २ ऑगस्ट) आणखी २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. (Nashik News)



महापालिकेने ११,६०९ खड्डे बुजवले


मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असले, तरी नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) रस्ते दुरुस्तीची मोहीम अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. प्रतिकूल हवामानातही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी शहरभर युद्धपातळीवर काम करत १ जून ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ११ हजार ६०९ खड्डे बुजविले आहेत. त्यानंतर केवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांत आणखी २ हजार ५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली. (Nashik News)



रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती


महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व सहा विभागांमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे. मुख्य रस्ते, वाहतुकीची मोठी वर्दळ असलेले मार्ग तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत आहेत. (Nashik News)



नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना


पावसामुळे रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन जीएसबी, मुरूम, कोल्डमिक्स तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या मिलिंग मटेरियलचा वापर करून खड्डे बुजविले जात आहेत. विशेषतः मिलिंग मटेरियलमुळे पावसाळ्यातील दुरुस्ती अधिक टिकाऊ व परिणामकारक ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, शहरातील विविध भागांत त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिले जात आहे. हवामानानुसार आवश्यक तांत्रिक उपाययोजनांचा वापर करून रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. (Nashik News)



१ जून ते २९ जुलै या कालावधीतील खड्डे दुरुस्ती


पंचवटी – ५,४८४


नाशिक रोड – २,०४९


सातपूर – १,८२०


पश्चिम – ८९८


नवीन नाशिक – ८५०


नाशिक पूर्व – ५०८


एकूण – ११,६०९



३० जुलै ते २ ऑगस्ट (चार दिवस) कालावधीतील दुरुस्ती


सातपूर – ८६९


पंचवटी – ४९६


पश्चिम – ३५४


नवीन नाशिक – ३१४


नाशिक रोड – ३१२


नाशिक पूर्व – २२३


एकूण – २,५६८

Comments
Add Comment

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण