Jiya Shankar Engagement : अफवांना पूर्णविराम; 'वेड' फेम जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा; 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ग्लॅमरस अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे नाव प्रसिद्ध युट्युबर अभिषेक मल्हानसोबत (Abhishek Malhan) जोडले जात होते आणि त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सिद्ध करत जियाने तिच्या आयुष्यातील खऱ्या जोडीदाराचा चेहरा जगासमोर आणला आहे.



"नाते कधीच नव्हते, मैत्रीही संपली"; अभिषेक मल्हानसोबतच्या अफवांवर स्पष्टीकरण


अभिषेक मल्हानसोबतच्या नात्यावर मौन सोडत जियाने सर्व स्पष्ट केले. ती म्हणाली, "आम्ही दोघे कधीही एकमेकांच्या प्रेमात नव्हतो, केवळ चांगले मित्र होतो. परंतु, आता ती मैत्रीही उरलेली नाही." या खुलाशानंतर तिने इन्स्टाग्रामवर तिच्या होणाऱ्या पतीसोबतचे अत्यंत गोड अन् रोमँटिक फोटो पोस्ट करत चाहत्यांना साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली.



"तूच माझे घर!"; होणाऱ्या पतीसाठी लिहिली भावूक अन् रोमँटिक पोस्ट




आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर करताना जियाने आपल्या होणाऱ्या पतीसाठी एक भावूक कॅप्शन लिहिले आहे. ती लिहीते, "जेव्हा तुम्ही अजिबात अपेक्षा करत नाही, तेव्हाच तुम्हाला खरे प्रेम मिळते, हे अगदी खरे आहे. देव बहुदा माझ्या संयमाची परीक्षा घेत होता. आपण हजारो मैल दूर असलो तरी तुझ्याशी बोलताना मला कायम घरी असल्याचा भास व्हायचा. विमानतळावर निरोप घेताना तू मला घट्ट जवळ घ्यायचास. जगात आपण कुठेही असू, पण माझे खरे घर कोणतीही वस्तू किंवा जागा नसून फक्त तूच आहेस!"



'करण' ठरला जियाचा रिअल लाईफ हिरो; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


आपल्या जोडीदाराचा उल्लेख 'Kaaran' (करण) असा करत जिया पुढे म्हणाली, "तुझ्यासोबतचे माझे आयुष्य म्हणजे एखादी रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे." जियाच्या या मिस्ट्री मॅनचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, जियाने आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुड्याची घोषणा केल्याने सोशल मीडियावर तिच्यावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत