Thane : ठाण्यात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

ठाणे : माजिवडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) दुपारी २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आहे की हत्या की आत्महत्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. कुमुधा शेट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. वर्तकनगर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.


वसंत लॉन्समधील सवाना टॉवर या २३ मजली इमारतीत २१ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कुमुधा शेट्टी वास्तव्यास होत्या. बुधवारी दुपारी सुमारे ३.४५ च्या सुमारास त्या सदनिकेच्या सज्जामधून दुसऱ्या मजल्यावरील पोडियमवरील भागात पडल्या. उंचावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वर्तनगर पोलिसांसह ठाणे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.


अग्निशमन दलाच्या जवानांनी पोडियमवरून मृतदेह खाली आणला. या प्रकरणी मृत व्यक्तीने लिहिलेली कोणतीही चिठ्ठी पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. यामुळे ही दुर्घटना आहे की हत्या की आत्महत्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. कुमुधा शेट्टी यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.

Comments
Add Comment

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या