Sunetra Pawar : 'गुंगी गुडिया' वाद तापला! सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या टीकेवर राष्ट्रवादीचा पलटवार; शिंदे, दमानियाही मैदानात

मुंबई : बीड दौऱ्यातील एका व्हिडिओवरून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) नवा राजकीय वाद रंगला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसल्याचे दिसत असल्याचा दावा करत काँग्रेसने त्यांना 'गुंगी गुडिया' अशी उपमा दिली. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने, "सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अजून किती दिवस 'गुंगी गुडिया' (Gungi Gudiya) बनून राहणार?" असा सवाल उपस्थित केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण (NCP Suraj Chavhan) यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, "लोकांपासून दूर गेलेल्या काँग्रेसकडूनच अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. विरोधकांनी कधीकाळी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याविरोधातही अशाच शब्दांचा वापर केला होता, पण इतिहासाने वेगळेच चित्र दाखवले. काँग्रेसला पराभव पचवता येत नसल्याने अशा पातळीवरची टीका केली जात आहे."



चव्हाण यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या नियमितपणे मुंबई आणि पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतात. बीडमधील पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीही त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली होती. मात्र, काँग्रेसने जाणूनबुजून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केला.



अंजली दमानियांचा काँग्रेसला सवाल :


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही काँग्रेसच्या भाषेवर आक्षेप घेतला. "'गुंगी गुडिया' ही भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभणारी नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे, पण एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे. मी याचा तीव्र निषेध करते," असे त्यांनी स्पष्ट केले.



शिंदेंचाही काँग्रेसवर हल्लाबोल :


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले, "काँग्रेसने असे शब्द वापरताना किमान जनाची तरी लाज बाळगायला हवी होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणींनी काँग्रेसला यापूर्वीच उत्तर दिले आहे."


यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (DY Patil) यांच्या निधनाबद्दलही शोक व्यक्त करत, "त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ते अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते," असे सांगितले.



राष्ट्रवादी महिला आघाडीचा इशारा :


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "'गुंगी गुडिया' असा उल्लेख करणे म्हणजे काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी आहे. सुनेत्रा पवार सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने तातडीने माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस त्याच भाषेत उत्तर देण्यास सक्षम आहे," असा इशारा महिला नेत्यांनी दिला.


या संपूर्ण प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा; फेक चॅट्स, बनावट ओळख अन् १.३० लाखांचा व्यवहार

मुंबई : मुंबई पोलिसांनी सलमान खानला लक्ष्य करणाऱ्या एका कथित खंडणीच्या कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे . या

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा