Eknath Shinde : ‘सुनेत्रा पवारांवरील टिप्पणी म्हणजे महिला शक्तीचा अपमान’; काँग्रेसवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. "पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे. असा अवमान कदापि खपवून घेतला जाणार नाही," असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.


पद्मश्री, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी (Eknath Shinde) काँग्रेसच्या भूमिकेवर निशाणा साधला.



"राजकीय विरोध करा, पण महिलांचा अपमान नको" :


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता महाराष्ट्रासमोर आला आहे. राजकीय विरोध जरूर करा, पण महिलांचा अपमान करून राजकारण करणे ही कोणती संस्कृती आहे? काँग्रेसने निदान जनाची तरी लाज बाळगायला हवी होती."


त्यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर करण्यात आलेली टिप्पणी ही केवळ एका व्यक्तीवरची टीका नसून संपूर्ण महिला शक्तीचा अवमान आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला हा अपमान कधीही विसरणार नाहीत. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा असून अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही.



'२०२४ चा धडा काँग्रेस विसरली का?'


यावेळी शिंदे (Eknath Shinde) यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. "२०२४ मध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेसला योग्य उत्तर दिले होते. महिलांचा अपमान करणाऱ्यांना जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल," असा इशारा त्यांनी दिला.



सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप :


काँग्रेसने (Congress) राजकीय विरोध करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, महिलांचा अवमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असा आरोप करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. सुनेत्रा पवारांवरील टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :

CM Devendra Fadnavis : विरोधी पक्षाच्या खासदारांना DPDC मधून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Committee) निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता विरोधी

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे

Nashik : नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप ? एकाच इमारतीत निघाले सहा संशयित रुग्ण

Nashik : शहरात पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असतानाच आता कावीळसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने

Gel Nail Polish Side Effects : युरोप, ब्रिटनमध्ये बंदी असलेला 'हा' धोकादायक केमिकल भारतीय जेल नेलपॉलिशमध्ये अद्याप सुरूच! जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : नेल आर्ट (Nail Art) आणि जेल मॅनिक्युअरचा (gel manicure Trend) ट्रेंड सध्या जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढला