Old Monk : मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! 'ओल्ड मंक'सह ६ ब्रँड्सवर FSSAI चा थेट दणका, नेमकं कारण काय?

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मद्य उद्योगातील नियमभंगाविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील सहा प्रमुख मद्य उत्पादक कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तपासादरम्यान कृत्रिम फ्लेवर्सचा बेकायदेशीर वापर, ग्राहकांची दिशाभूल करणारी लेबल्स आणि खोटे दावे केल्याचे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या कारवाईची माहिती दिली.




'या' ब्रँडवर फसाईची नजर 

या कारवाईत ओल्ड मंक, मॅकडोवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय गोव्यातील मॅडेक्सी डिस्टिलरीज अँड ब्रेव्हरीज येथेही FSSAIच्या पथकाने तपासणी करून मद्याचे नमुने जप्त केले आहेत.


तपासात अनेक उत्पादकांनी अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करून स्टँडर्ड अल्कोहोलिक पेयांमध्ये कृत्रिम फ्लेवर्स मिसळल्याचे समोर आले. मात्र, या कृत्रिम मिश्रणाचा उल्लेख बाटल्यांच्या लेबलवर करण्यात आला नव्हता. त्यामुळे ग्राहकांना नैसर्गिक आणि मानक दर्जाचे उत्पादन असल्याचा आभास निर्माण करून दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे.


तपासादरम्यान न्यूट्रल अल्कोहोलपासून तयार केलेली उत्पादने 'स्टँडर्ड रम' किंवा 'स्टँडर्ड व्हिस्की' म्हणून विकली जात असल्याचेही आढळले. तसेच 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' किंवा 'व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट' असा आवश्यक उल्लेख अनेक उत्पादनांवर टाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. ओल्ड मंक रमच्या बाटल्यांवर '७ वर्षे जुनी' असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मॅच्युअर्ड रम स्पिरिटचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचा आरोप FSSAIने केला आहे.


दरम्यान, ही कारवाई संपूर्ण मद्य उद्योगाविरोधात नसून केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. FSSAIच्या सर्व मानकांचे पालन करणाऱ्या उत्पादकांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या