Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा काढणार 



मुंबई : खोपोली येथील नगर परिषदेच्या हद्दीतील मत्स्यबीज केंद्राची जागा पाणी साठवण प्रकल्पाला देणार असून मत्स्यव्यवसाय विभाग मत्स्यबीज केंद्राचे हित अबाधित ठेवून सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधत योग्य तोडगा काढणार असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.


खोपोली नगरपरिषद हद्दीतील मत्स्यव्यवसाय विभागांच्या जागेवर भविष्यातील पाणी साठवण प्रकल्पाबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी श्री राणे बोलत होते.यावेळी आमदार महेंद्र थोरवे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार , रायगड जिल्हाधिकारी, (दूरद्ष्य प्रणाली द्वारे) यांच्या सह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मंत्री नितेश राणे म्हणाले, "खोपोली मत्स्यबीज केंद्र हे राज्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. या केंद्राच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेताना मत्स्य उत्पादन, मत्स्यबीज निर्मिती आणि मत्स्यव्यवसायिकांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. महसूल, नगररचना आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून कायदेशीर व प्रशासकीय चौकटीत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."



बैठकीत जागेचे योग्य मूल्यांकन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नगररचना विभागाकडून अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे.


मत्स्यव्यवसाय विभागाचे उद्दिष्ट राज्यातील मत्स्यबीज निर्मिती क्षमता अधिक सक्षम करणे, मत्स्यव्यवसायिकांना दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देणे आणि मत्स्य उत्पादन वाढीस चालना देणे हे आहे. त्यामुळे खोपोली केंद्राच्या संदर्भातील कोणताही निर्णय राज्याच्या दीर्घकालीन मत्स्यविकासाच्या दृष्टीने विचारपूर्वक घेतला जाईल.



राज्य शासन या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय साधून मत्स्यव्यवसाय विभागाच्या हिताचे संरक्षण करत व्यवहार्य आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम तोडगा लवकरच निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य