Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा!

- मंत्री नितेश राणे यांची टीका; ज्यांना 'बेस्ट'ची निवडणूक जिंकता आली नाही त्यांनी भाजपवर बोलू नये


मुंबई : बिहारमधील पोटनिवडणुकीतील पराभवावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपवर बोलण्यापेक्षा आधी स्वतःचा वरळी मतदारसंघ सांभाळावा, २०२९ ची निवडणूक त्यांना अत्यंत कठीण जाणार आहे, असा टोला राणे यांनी लगावला. ( Aditya Thackeray)


एका पोटनिवडणुकीतील पराभवाने विरोधकांना खूप आनंद झाला असला तरी जनमताचा नेहमीच आदर केला पाहिजे, असे सांगत नितेश राणे म्हणाले की, नुकतीच मुंबईत झालेली 'बेस्ट' पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. दोन्ही ठाकरे एकत्र लढूनही तोंडावर आपटले, मग आता मराठी माणसाने यांना लाथ मारून हकलवून लावले असे आम्ही म्हणायचे का, असा सवाल त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार आले असून आमचा मुख्यमंत्री तेथे बसला आहे, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.


राज्यात नव्याने लागू झालेल्या 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचे' स्वागत करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन पूर्ण करत हा कायदा अधिवेशनात संमत करण्यात आला असून राष्ट्रपतींचीही त्याला मंजुरी मिळाली आहे. या कायद्यामुळे राज्यातील हिंदू माता-भगिनींकडे नावाने वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. (BJP Maharashtra)




जरांगे आणि सरकारमध्ये उत्तम संवाद


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ७ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत बोलताना राणे यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये उत्तम संवाद असून, बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांवर नक्कीच मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या होत्या आणि पुढेही सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Panvel ATM Fraud : पनवेलमध्ये ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपये लंपास

पनवेल : पनवेल शहरात ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचं

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य

Nashik : कुंभमेळा पर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार, शाहिस्नानानंतर साधू-संतांना दर्शनात अडथळा नाही - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्व काळात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय

Nashik News : श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला ! दानपेट्यांमध्ये 'इतके' लाख जमा

Nashik News : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple) भाविकांनी