Nashik : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील शिवडी गावाजवळील पालखेड कालवा परिसरात १७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैची मृत्यू झाला आहे. गुरांना पाणी पाजताना १७ वर्षीय विद्यार्थ्याचा डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून या घटनेनं परिसरात शोककळा पसरल्या आहेत.
Nashik : शेतकऱ्यांसाठी जमीन म्हणजे सर्व काही असतं. मात्र हीच जमीन जर परस्पर तिसराच विकत असेल तर... तर पायाखालचीही जमीन सरकेल ! नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) ...
एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत
ओम नवनाथ जाधव (वय १७) (Om Navnath Jadhav) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. ओम संध्याकाळी जनावरे पाणी पाजण्यासाठी पालखेड कालवा परिसरात (Palkhed Canal Area) गेला होता. त्यावेळी त्याचा अचानक तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी शोधकार्य सुरू केले. तसेच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने (Disaster Management Committee) शोधमोहीम राबवली. अंधारामुळे रविवारी रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. अखेर दुपारी सुमारे तीन वाजता पालखेड डावा कालवा,चारी क्रमांक १४ जवळ ओमचा मृतदेह आढळून आला.
ओम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिवडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.